तीन महिन्यानंतर झाली पुणे मनपाची सर्वसाधारण सभा

0

पुणे:- राज्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून सर्वसाधारण सभा झाली नव्हती. कायद्यानुसार तीन महिन्यात सर्वसाधारण सभा न झाल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत सर्वसाधारण सभा पार पडली.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळसह, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सभागृहात येण्याअगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ केले तसेच स्क्रीनिंग करून मनपात दाखल झाले. सभागृहात प्रत्येक नगरसेवक करिता सोशल डिस्टंन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी शहराच्या सद्यस्थितीवर प्रशासन कशाप्रकरे काम करत आहे, यावर चर्चा झाली पाहिजे. अशी विरोधकांकडून मागणी करण्यात आली. मात्र महापौरांनी आपण मोठ्यासंख्येने एकत्र जमलो आहोत, कोरोना संसर्गाच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे सांगत चर्चा करण्यास नकार दिला.