तीन महिन्यापुर्वी हरविलेली मुलगी आढळली

0

सोयगाव तालुक्यातील शिवणा मुलगी

जळगाव । सोयगाव तालुक्यातील शिवणा या गावातून तीन महिन्यापूर्वी हरविलेली बालिका जळगावातील अंजिठा चौफुली चौकात मिळून आली होती. स्मृतीभ्रंश झालेल्या या बालिकेला स्वताचे नाव व पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे या बालिकेला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते. या बालिकेच्या पालकांचा एमआयडीसी पोलिसांकडून सतत शोध सुरु होता. आज एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने या 14 वर्षीय बालिकेला तिच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले. रमा अरुण जगताप (वय-14) रा. शिवणा, ता.सोयगाव, जिल्हा औरंगाबाद ही बालिका 11 डिसेंबर रोजी शहरातील अंजिठा चौफुली चौकात फिरत असतांना मिळून आली होती. या बालिकेची स्मृतीभ्रंश झाल्याने या बालिकेला तिचे स्वताचे नाव व पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी या बालिकेला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. याठिकाणी सुधारगृह अधिक्षक जयश्री पाटील, लिपीक सुनंदा पाटील यांनी तिला वारंवार नाव व पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. या बालिकेने तिचा पत्ता पाचोरा तालुक्यातील शिवणी तसेच पहूर येथील दोंधेगाव तसेच सोयगाव तालुक्यातील दोंधेगाव असा सांगितला होता. याठिकाणी पोलिसांनी तपास केला परंतू पोलिसांना कुठलीही माहिती मिळत नव्हती.