जळगाव । आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.अरविंद मोरे यांच्या खून प्रकरणीचा तपास स्थानिक गुन्हे शाखाकडे वर्ग करण्यात आला आलेला आहे. यातच पोलिसांनी डॉ. मोरे यांच्या खूनप्रकरणी आणखी तिन महिलांसह एका डॉक्टराला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात 13 ते 15 जणांची पोलिसांकडून चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले आहे. तर जी माहिती मिळेल त्या गोष्टीचा पोलिस बारीकसारीकपणे तपास करीत आहेत.
रक्ताळलेला लहान पायाचा ठसा कोणाचा?
या खून प्रकरण पोलिसांनी नाशिक येथिल एक महिला, भुसावळ येथिल दोन महिला व धुळे येथील एका व्यक्तीला ताब्यात घेवून चौकशी केली आहे. तर धुळेसह नाशिक येथे पाठविण्यात आलेले पथक जळगावी परतले असून त्यांनी धुळे येथील घरकाम करणार्या तीन महिलांना तसेच नाशिक येथील एका डॉक्टराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यातच त्यांची देखील कसून चौकशी करण्यात येत आहे. तर त्यांच्याकडून डॉ.मोरे यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती देखील काढण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात देखील गळा चिरण्यासाठी वापरलेली करवत देखील घरातील असल्याचे निषन्न झाले आहे. परंतू, रक्ताचे पायांचे ठसे हे मोरे यांच्यासह एक ठसा लहान मिळून आला आहे.
बनावट अकाउंट बनवून टाकल्या अश्लील पोस्ट
जळगाव। फेसबूकवर महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे फोटोसह बनावट अकाउंट तयार करून अश्लिल माहिती टाकून बदनामी केल्याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम पेठ येथील नितीन दौलत चंदनकर याचे ऑगस्टपासून ते आजपर्यंत फेसबूकवर अज्ञात तरूणाने बनावट खाते उघडून त्यावर त्याचा फोटो लावला आहे. त्यानंतर अश्लिल मेसेज, लिखाण करून त्यास बदनाम केले जात होते. अखेर हा प्रकार नितीन याच्या लक्षात आल्यानंतर त्याने वडीलांना घडत असलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली. यानंतर नितीन व वडील दिनेश दौलत चंदनकर यांनी शहर पोलिस स्टेशन गाठत घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती पोलिसांना दिली.