तीन म्हशी ठार

0

रोहा – रोहा वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा तीन मुक्या जनावरांच्या जिवावर बेतला आहे. वीज कंपनीच्या सुस्त कारभारामुळे येथील स्थानिक गरीब शेतकर्‍याच्या तीन म्हशी विजेचा शॉक लागून जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी अष्टमी खालचा मोहल्ला कब्रस्तान जवळील मोकळ्या जागेत घडली आहे.