तीन राज्यातील बलात्कार्‍यांना फाशी द्या

0

वरणगाव । जम्मू काश्मिरसह उत्तरप्रदेश व गुजराथ राज्यात अल्पवयीन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व या घटनेतील दोषींना फाशी देण्याची मागणीसाठी शहरातील सर्व धर्मीय बांधवांनी शुक्रवार, 20 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मूक मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. रणरणत्या उन्हातही सर्वधर्मीय नागरीकांचा सक्रिय सहभाग एकात्मतेची साक्ष देणारा ठरला.

चिमुकल्यांनी दिले निवेदन
शहरातील मदिना मजीद व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्रापासून मूक मोर्चाला सुरुवात झाली. स्टेशन रोडवरून वरणगाव पोलीस ठाण्यात मोर्चेकर आले. वरणगावचे सहाय्रक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांना चिमुकली बालिका अलीना काजी हिने निवेदन दिले. अत्राचार करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा व्हारला पाहिजे तसेच हे खटले फास्ट ट्रॅक न्रारालरात चालविण्याची मागणी करण्यात आली. सुमारे हजारावर सर्व धर्माचे नागरीक मोर्चात सहभागी झाले. ळगाव दंगा पथक निरंत्रण पथकासह व वरणगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.