तीन राज्यातील विजयानंतर भुसावळ विभागात काँग्रेस-राष्ट्रवादीचा जल्लोष

0

मुक्ताईनगरात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक, यावलमध्ये पेढे वाटप तर वरणगावात फटाक्यांची आतषबाजी

भुसावळ- मध्यप्रदेशासह राजस्थान, छत्तीसगड राज्यामध्ये काँग्रेसला मिळालेल्या यश मिळाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करून पेढे वाटप करून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा जय-जय-जयकार करण्यात आला.

मुक्ताईनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष
मुक्ताईनगर- काँग्रेसने तीन राज्यात मिळवलेल्या यशानंतर मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला तसेच पेढे वाटप करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान, जिल्हा सचिव संजय पाटील, शहाराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, अ‍ॅड.अरविंद गोसावी, अशोक पाटील, ज्येष्ठ नेते बी.डी.गवई, रवी दांडगे, मारोती सुरडकर, अरुण कांडेलकर, शिव कोळी, रामराव पाटील, नाना पाटील, मोहम्मद यासीन खान, हिरासिंग चव्हाण, अनिल सोनवणे, अतुल जावरे, दिनकर भालेराव, आर.के.गणेश, तुकाराम पानपाटील, करीम शेख, राज जाधव, महेश खुळे, नईम खान रऊप खान, फिरोज टेलर, वहाब खान इसाक खान, दादाराव पाटील, शेख रहिम शेख जब्बार, रईस शेख रशीद काझी, आतीक काजी, शे.अरमान शे.महेबूब, तौसीक काजी बशीर काजी, रोहित भालेराव, रोहित भालेराव, साबीर खान मुबारक खान, शे.साबीर शे.सबदर, शे.ईस्माईल शे.रासुद, शे.जुनेद श.रऊफशेख वसीम, शाहरुख शे.इसाक, शादाब बेग, आबीद शेख लाल, नदीम शे.कलीम, ताज मोहम्मद, शे.तौफिक शे.रफिक आदींची उपस्थिती होती.

यावलमध्ये विजयानंतर घोषणाबाजी
यावल- मध्यप्रदेशासह राजस्थान, छत्तीसगड राज्यामध्ये काँग्रेसला यश मिळाल्यानंतर यावल येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जल्लोष केला. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पेढे वाटप आनंद व्यक्त केला. जिल्हा परीषद गटनेता प्रभाकर सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी काँग्रेसच्या विजयाबाबत घोषणाबाजी करण्यात आली.

वरणगावातदेखील पदाधिकार्‍यांचा जल्लोष
वरणगाव- तीन राज्यातील विजयानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने बसस्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी मल्लू पहेलवान, प्रा.मनोज देशमुख, के.बी.काझी, पंकज पाटील, अनिल पाटील, शैलेश बोदडे, राजू पालिमकर, राजेश काकानी, ज्ञानेश्वर पाटील, सीताराम गुमळकर, शैलेंद्र ससाने, जयंता सुरपाटणे, शहराध्यक्ष अशफाक काझी, पप्पू काझी, आबीद कच्ची, राजेंद्र चौधरी, विष्णू खोले, गजानन वंजारी, राजेश चौधरी, समाधान चौधरी, गोपाळ पाटील, वाय.आर.पाटील, दीपक मराठे, अतुल चौधरी, मनोज चव्हाण, पप्पू जकादार आदी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळातही काँग्रेसतर्फे जल्लोष
भुसावळ- जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे फटाके फोडून व मिठाई वाटप करून विजयानंतर जल्लोष करण्यात आला. माजी आमदार नीळकंठ फालक, मो.मुन्वर खान, रघुनाथ चौधरी, राजेंद्र पटेल, जे.बी.कोटेचा, ईस्माईल गवळी, सलीम गवळी, डॉ.सुवर्णा गाडेकर, हमीदा गवळी, योगेंद्रसिंग पाटील, अकील शाह, मेहबूब खान, अकील शाह, संजय खडसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.