तीन लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लांबवली

भुसावळ  : प्रवासी झोपताच चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज असलेली पर्स पाटलीपूत्र एक्स्प्रेसमधून लांबवली. लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला.

एस.सी.रेल्वे बोगीतही चोर्‍या वाढल्या
पाटली पुत्र एक्स्प्रेसच्या ए-1 या वातानुकूलित डब्यातून 1 व 3 नंबरच्या सीटवर बसून जावेद इकबाल (रा.कल्याण) हे प्रवास करीत असताना मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास इटारसी (मध्यप्रदेश) या रेल्वे स्थानकापूर्वी चोरट्यांनी त्यांची पर्स लांबवली. या पर्समध्ये पाच ग्रॅम वजनाचे प्रत्येकी पाच जोड वजनाचे व अन्य दागिणे तसेच 12 हजारांचे कपडे व अन्य साहित्य मिळून तीन लाख 37 हजारांचा ऐवज होता. इटारसी रेल्वे स्थानक सोडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात येताच गाडी भुसावळ जंक्शनवर आल्यावर त्यांनी येथील लोहमार्ग पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला.