तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

0

पतीसह 9 जणांवर एमआयडीसीत गुन्हा
जळगाव | पहिल्या पत्नीला पाच वर्षाचा मुलगा असून देखील त्या पतीने दुसरे लग्न केले. तसेच माहेरुन तीन लाख रुपये आणण्यासाठी मानसिक छळ करणार्‍या पतीसह ९ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील तांबापुरातील बिसमिल्ला चौकातील रफिक उर्फ राजू शेख शरीफ हा पत्नी कौसरबी रफिक यांच्यासह आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्यास आहे. दरम्यान रफिक शेख यांना पहिल्या पत्नीपासून पाच वर्षांचा मुलगा असल्याचे लपवून त्यांनी कौसरबी रफिक यांच्यासोबत लग्न केले. लग्नात त्यांनी १० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने हूंडा म्हणून घेतले. मात्र लग्नानंतर रफिक शेख यांच्यासह रजीयाबी शेख शरीफ, सुंदरबी शेख शरीफ, जायदाबी जुबेरखान, जुबेरखान सिराजखान यांच्यासह नऊ जण त्यांचा कौसरबी यांना व्यापारासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणण्यासाठी वारंवार त्यांना मानसिक छळ करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून छळ होत असल्याने ३१ ऑगस्ट रोजी कौसरबी यांनी पोलिस स्टेशनला धाव घेत. पहिल्या पत्नीपासून 5 वर्षाचा मुलगा असल्याचे लपवून ठेवून फसवणूक व माहेरुन पैसे आणावे, यासाठी मानसिक छळ केल्याप्रकरणी 9 जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.