तीन लाखासाठी विवाहितेचा छळ

0

धुळे येथील पतीसह तिघांवर गुन्हा

चाळीसगाव । लग्नात मानपान, भेटवस्तु मनाप्रमाणे दिल्या नाहीत व चारित्र्याचा संशय घेवुन माहेरुन 3 लाख रुपये आणावे याकारणावरुन 39 वर्षीय विवाहीतेस शिवीगाळ मारहाण करुन छळ करणार्‍या धुळे येथील पती, सासु व दिराविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी मालती राजेंद्र अहिरे (वय-39) रा.अशोक नगर धुळे ह.मु. चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे 9 फेब्रुवारी 1992 रोजी राजेंद्र संतोष अहीरे रा. अशोक नगर धुळे यांच्याशी लग्न झाले 3 वर्ष चांगली वागणुक दिल्यानंतर पती राजेंद्र संतोष अहीरे, सासु रेश्मा संतोष अहीरे, दिर समाधान संतोष अहीरे तिघे रा.अशोक नगर धुळे हे त्यांच्यावर चारित्र्याचा संशय घेवुन लग्नात मानपान दिला नाही, मनाप्रमाणे भेटवस्तू दिल्या नाही म्हणुन टोचुन बोलून शिवीगाळ मारहाण करुन दमदाटी करीत होते. त्यांच्या पतीचा क्रिडा व विद्न्यान साहित्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी माहेरुन तिन लाख रुपये आणावेत म्हणुन तिघे आरोपी तगादा लावुन चारीत्र्यावर संशय घेवुन शारीरिक, मानसीक, छळ करुन मारहाण करीत असत. 3 जून 2017 रोजी आरोपी पती, सासु, दिर यांनी पैसे आणले नाहीत याकारणावरुन सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घरातुन माहेरी हाकलुन दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी वरील तिघा आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.