तीन वर्षांचे वावटळ

0

सरकारची 3 वषेर्र् म्हणजे एक वावटळ. कायम उत्तेजित आक्रमक घटनांचा सिलसिला. मोदींनी राजकारणात कुणाला एका क्षणाचीही उसंत घेऊ दिली नाही. मूळ विषयापासून देशाचे लक्ष दुसरीकडे वळवून आपले राजकारण पुढे ढकलण्याचे काम मोदीसाहेबांनी अत्यंत शिताफीने केले आहे. कार्यक्रमांचा आणि घोषणांचा भडिमार करून विरोधकांना निष्प्रभ करून सोडले आहे. विरोधकातील शरद पवारांसारख्या लोकांना फोडून, चौकशीची टांगती तलवार मानेवर ठेवून चिदम्बरम/पवारसकट अनेक विरोधकांची तोंडे बंद करून टाकली. सोनिया गांधीनी या सर्व मूकबधिर लोकांना एकत्र करून मोदी विरुद्ध सर्व असे अभियान सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. हे मोदीसाहेबांच्या राजकारणाचे यश म्हणावे लागेल. यांच्यामध्ये अनेक सूर्याजी पिसाळ घुसवून विरोधकांची युती ठिसूळ करून टाकली आहे.

शेकापपासून साम्यवादी हे काँग्रेस/राष्ट्रवादीबरोबर एक झाले आणि डाव्या चळवळीचे उरलेले अस्तित्व नष्ट करून टाकले. स्वातंत्र्यापासून काँग्रेसला विरोध करणारी ही तत्त्वे अचानक फक्त भाजपला विरोध करण्यासाठी एक झाली. हे लोकांच्या पचनी पडेल हे समजणे म्हणजे लोकांना मूर्ख समजणे आहे. बंगालमध्ये अतिशय शक्तिशाली असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बंगाल मध्ये काँग्रेसशी युती केली आणि भुईसपाट झाले. अशा अर्धवट युतीचे परिणाम नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद नागरपालिकेत दिसले. अनेक ठिकाणी काँग्रेस-शिवसेना युती आहे. शिवसेना-राष्ट्रवादी, भाजप-काँग्रेस अशा तत्त्वशून्य बाजारी राजकारणाने सर्व पक्षाची वैचारिक अधोगती प्रदर्शित केली आहे. आजचा काँग्रेसवाला उद्याचा भाजपवाला आहे आणि उलटदेखील आहे. मोदींनी बहुजन चळवळ समरसतेच्या तत्त्वावर तोडूनफोडून टाकले. शिवरायांना तर आधीच आपले प्रतीक करून टाकले होते. आता दलितांना जवळ करण्यासाठी बाबासाहेबांना ही आपलेसे करण्याची मोहीम सुरू केली. या सर्व प्रयत्नात मोदींचा वास्तवतेचा गाडा अभ्यास स्पष्ट दिसतो. पुतळ्यांच्या आणि स्मारकाचे राजकारण मोदींनी यशस्वीपणे राबवले. हे करताना त्यांनी आपल्या विचारधारेच्या विरोधी असलेल्या विचारधारेला आपलीच विचारधारा असल्याचे भासवणे म्हणजे कमालीची लवचीकता. मोदी साहेबांनी ती प्रदर्शित केली आहे. मोदीसाहेब आणि यांचे सहकारी गोळवलकर, हेगडेवार, मुंजे यांची नावे घेण्यावर बिलकूल भर देत नाहीत. तात्पुरते आपल्या महापुरुषांना आराम देऊन दुसर्‍यांचे महापुरुष आपले करणे हे या लवचीकतेची कहाणी म्हणजे मोदीसाहेबांचे 3 वर्षे. असे करून भारताला व येथील नागरिकांना वैचारिक दिवाळखोरीकडे ढकलले. मनमोहन सिंग यांनी केलेली सुरुवात मोदीसाहेबांनी पूर्ण केली. व्यापारी तत्त्वज्ञान म्हणजे भारताचे तत्त्वज्ञान. फक्तपैशाची अन् फायद्याची भाषा. व्यापार उद्योग किती केला, नफा किती मिळवला हीच विचारसरणी.

कोपर्डी निर्भया आणि अनेक बलात्कारांची नोंद कुठेच नाही. गुन्हेगारी, दहशतवादाचे वाढते स्वरूप, आमच्या भगिनीवर होणारा अत्याचार. दाही दिशांनी पाण्यासाठी भटकणार्‍यास जनतेने शौचालयावर खूश व्हावे, ही मानसिकता भडक प्रचाराच्या आड लपून जाते. मोदींच्या भारतात दुसर्‍या विचारसरणीला जागाच नाही. वास्तववाद म्हणजे धंद्यातील सत्य तेच विचारसरणीत मोदींनी बदलून टाकले. नाहीतर यांचे मूळ तत्त्वज्ञान म्हणजे हिंदुत्व. आता बाबासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे. उलट बाबासाहेब तर हिंदुत्वाचे कट्टर विरोधक. मुळात हिंदुत्व हेच एक मृगजळ आहे. ज्याला वास्तवात परावर्तीत करता येत नाही. पण त्या शब्दात भावनिक आकर्षण आहे. हिंदुत्वाचा अर्थ मनुस्मृतीत असेल, तर सती, पुनर्विवाह, महिलांचा मालमत्तेवरील हक्क, चार्तुवण्यर्र् हे सर्व आलेच. हा यांचा गुप्त अजेंडा तर नाही. तीन वर्षांत मोदींनी समतावादाला निष्प्रभ करून टाकले. आर्थिक समता तर लुप्त झाली. समाजालाच वास्तवापासून दूर नेऊन गाईबैलांच्या राजकारणात गुंतवून टाकले. आता गोरक्षक काही लोकांना पकडून मारतात, ही बातमी होतेच. त्याला भाजपवाले विरोध दर्शवतात. चर्चा वाढत जाते. मग डावे/काँग्रेसवाले निषेध करतात, बीफ पार्ट्या करतात. चर्चा वाढत जातात. तो मुख्य अजेंडा बनून गेला. दुसरीकडे नोकर्‍या, बेकारी वाढत जाते. कष्टकरी मुंबईसारख्या शहरातून बाहेर फेकला जातो. शेतकरी उद्ध्वस्त होतो. हे विषय चर्चेचे विषय राहत नाहीत, हा मोदींचा मोठा विजय आहे.

श्रीमंतांच्या व्यवस्थेचे अचूक प्रदर्शन आहे. अमेरिकन भांडवलशाही हेच भारतातील सत्य आहे. भारत हा मोदीसाहेबांचा ीहळपळपस इंडिया आहे. जिथे खरे लाभार्थी अंबानी, अडाणी आहेत. गरिबीही नको ती अडचण आहे. गरिबांना तुकडे फेकत राहायचे आणि बुलेट ट्रेन, स्मार्ट शहरे, मेट्रो, महामार्ग याच्यासाठी प्रचंड पैसा फेकत जायचा. गरिबांना कष्टकर्‍यांना मोठ्या घोषणात अडकवून टाकायचे. मोदींनी लोकांसाठी काम केले नाही, असे आपण म्हणू शकत नाही. पण ते तुकडे होते. खरे या देशाचे उद्दिष्ट समतामुलक समाज आहे. त्यात आर्थिक समता मुख्य मार्ग आहे. हे कुठे दिले आहे? तर संविधानात. तेच संविधान जे जनतेला, नोकरीचा, शिक्षणाचा, अन्नाचा, घराचा, आर्थिक समतेचा हक्कदेते. त्यालाच बदनाम करून टाकण्यात व्यवस्था यशस्वी झाली आहे. भारतीय संविधानाला दलितविरोधी चळवळीतील लोक विरोध करत आहेत. कारण असे भासवले गेले आहे की संविधान हे दलितासाठी आहे. ते विसरत आहेत की याच संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला घटना कलम 21 प्रमाणे जगण्याचा अधिकार दिला आहे. पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने जगण्याच्या अधिकाराचा अर्थ म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार असे केले आहे. म्हणजे फक्त जनावरासारखे जिवंत राहण्याचा अधिकार नव्हे, तर मानवतेला साजेसे सन्मानाचे जीवन जगण्याचा अधिकार असा कायदा निर्माण केला. या निकालाचा विस्तार करताना सर्वोच्च न्यायालय म्हणते की, हे साध्य करायला प्रत्येकाला प्रथम रोजगार मिळाला पाहिजे. नंतर रोजगाराच्या ठिकाणी घर. बरोबरच अन्न, पाणी, आरोग्य, शिक्षण आलेच. हे सरकारचे काम आहे.

हे काँग्रेस सरकारने किती केले? हा प्रश्‍न विचारण्यापेक्षा मोदी सरकारने 3 वर्षांत काय केले? हे महत्त्वाचे आहे. मनमोहन सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला. देश अमेरिकेला विकून टाकला. हे जगापासून लपवण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये. त्यांच्या अपयशामुळेच मोदींना लोकांनी डोक्यावर घेतले आणि सत्तेवर आणले. पण त्याचा अर्थ असा होत नाही मोदी सरकार त्याच चष्म्यातून सुटू शकेल. शेवटी तुम्ही निवडणुकीत दिलेली आश्‍वासने हे तुमचे थडगे ठरू शकते. आता लवकरच मोदींची परीक्षा होणार आहे. तुमच्या आश्‍वासनाचे फोकनाड उघड झाले, तर तुम्हाला त्याच निर्दयतेने जनता घरी बसवेल. सन 2004 मध्ये ीहळपळपस इंडियावाल्यांना भुईसपाट करून दुसर्‍यांना लोक पुन्हा सत्तेवर आणू शकतात, हे मोदीसाहेबांनी विसरू नये. मोदीसाहेबांनी सत्तेवर आल्याबरोबर मतदारांचा विश्‍वासघात केला. थेट नवाज शरीफलाच शपथविधीला बोलावले. इथपासून जनता सुरुवात करेल.
ब्रि. सुधीर सावंत – 9987714929