तीन विभागात वीजपुरवठा बंद

0

जळगाव । जळगांव जिल्ह्यातील जळगांव,भुसावळ व पाचोरा या विभागातील वीज पुरवठा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवार 24 जुन रोजी दोन ते चार तास बंद राहणार आहे. तरी सर्व वीजग्राहकांना सहकार्‍याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. कामे वेळेच्या आत पुर्ण झाल्यास विद्यूत पुरवठा त्वरीत सुरु करण्यात येईल. कृपया संबंधित वीज ग्राहकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाचोरा विभाग -132 केव्ही पारोळा या उपकेंद्रातून निघालेल्या 132 केव्ही अंमळनेर पारोळा बे-लाईनवरील 33 केव्ही पारोळा, तामसवाडी, सावखेडा, बद्रापुर, मंगरूळ व रत्नपिंप्री या सहा उपकेंद्रावरील वीजपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 2 या चार तासाकरीता बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

जळगाव विभागातील या गावांचा समावेश
220 केव्ही बांभोरी उपकेंद्रातून निघणार्‍या 33/11 केव्ही किनोद या उपकेंद्रावरील किनोद, फुपनगरी, देवगाव, अमोदे, जामोद, पळसोद, भेकर, भादली खुर्द, गाळोदे या भागातील वीजपुरवठा दुपारी 1.30 ते 4.00 या वेळेत बंद राहील. 33/11 केव्ही कानळदा या उपकेंद्रावरील कानळदा, आव्हाणे, खेडी, वडनगरी, नंदगाव, पिलखेडा, कुवरखेडा, फुपनगरी, नांद्रा, फेसर्डी या भागातील वीजपुरवठा दुपारी 4.00 ते 6.30 या वेळेत बंद राहील. 33 केव्ही शिवाजीनगर उपकेंद्रावरील शिवाजीनगर, प्रजापतनगर, इंद्रप्रस्थनगर, गेंदालाल मिल, राजमालतीनगर, मिल्क फेडरेशन परिसर, महाविरनगर, दत्त कॉलनी, उस्मानिया पार्क, सत्यम पार्क, कानळदा रोड परिसर, रेल्वे कॉलनी, केसी पार्क, काळे नगर, भुरेमामलेधार परिसर, केजीएन पार्क, महम्मदीया नगर, लाकुडपेठ परिसर, उमर कॉलनी, त्रिभुवन कॉलनी, हरिओमनगर, आरवाय पार्क, फुपनगरी, घरकुल परिसर या भागातील वीजपुरवठा सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत बंद राहील.

तीन तासाची भर: नुकताच पावसाळा लागला असून अजूनही विजवितरण विभागाकडून अद्याप तांत्रीक अडचणींचा समाना करावा लागत आहे. ग्रामीण भागात असून तीन तासाचे भारनियमनावर भर पडणार आहे.

भुसावळ विभाग
132 केव्ही पहूर उपकेंद्रातून निघणार्‍या 33/11 केव्ही तळेंगाव, फत्तेपुर, शेंदुर्णी, नेरी, तोंडापुर व पिंपळगाव या सहा उपकेंद्रावरील वीजपुरवठा सकाळी 10 ते 12.00 या दोन तासाकरीता बंद राहणार आहे. त्यात तळेगांव,आमखेडा, शहापुर, भाटी, सामरोड, फत्तेपुर शेती, वाकडी शेती, तोंडापुर शेती, गोद्री शेती तोंडापुर गावठाण, फत्तेपुर गावठाण, गोद्री गावठाण, देउळगाव, मेंगाव,शेंदुर्णी, बिलवाडी, मेंगाव गावठाण, नेरी, मोहाडी शेती, नेरी गावठाण,मोहाडी गावठाण, गाडेगांव शेती, चिंचखेडा, भारूडखेडा, भगदरा, सोनाला, टाकली या 11 केव्ही वाहिन्यांवरील वीजपुरवठा बंद राहील.