बारामती । गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढताना चोरट्याने प्रवासी अमोल विक्रम लांडगे यांच्याजवळील 3 हजार 400 रुपये लंपास केले. याबाबत बारामती शहर पोलिस स्टेशनला लांडगे यांनी तक्रार दिली आहे. नातेपुते बसमध्ये चढत असताना ही घटना घडली.
बारामती बसस्थानकावर बॅगा पळविण्याचे, मोबाईल चारण्याचे, खिसे कापण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. बसस्थानकावर दोन पोलिसांची गस्त असते. मात्र प्रत्यक्षात कित्येकदा पोलिसाच ड्युटीवर नसतात. बारामती बसस्थानकावर नेहमीच मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा चोरटे घेतात. सीसीटीव्ही कॅमेरे जरी असले तरी बसमध्ये प्रवासी चढताना दरवाजा व गर्दी ही सीसीटीव्हीमध्ये येतच नाही. याच संधीचा फायदा खिसेकापू घेतात.