तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी परीक्षा

0

जळगाव। राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या लिपीक टंकलेखक पदाची परीक्षा रविवारी 11 रोजी घेण्यात आली. शहरातील 13 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील 3 हजार 664 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 3 हजार 161 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 503 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते.

सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. गैर प्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्र क्षेत्रात मनाई आदेश जारी केले होते. शविवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने ग्रामीण भागातुन येणार्‍या परीक्षार्थींना काहीसा अडचणींचा सामना करावा लागला.