यावल– मनवेलच्या श्री भुवनेश्वरी आश्रमाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळूनही कुठलीही विकासकामे होत नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मनवेलपासून एका किलोमीटर अंतरावर श्री भुवनेश्वरी आश्रमाल असून त्यास क दर्जा देण्यात आला आहे शिवाय तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश होवून सात वर्ष उलटली तरीदेखील विकासकामांसाठी अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
आश्रमाला समस्यांचा विळखा
जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रयत्नाने श्री भुवनेश्वरी आश्रमाला सात वर्षापासून क दर्जाच्या तिर्थक्षेत्राच्या यादीत समाविष्ट करण्यात आले मात्र एक रुपयाही निधी न मिळाल्याची खंत भाविकांना आहे. येथे श्री संत बनवारीदास बाबा यांचे वास्तव्य होते. प.पू.गंगा मातेसह विविध संताची पावणभूमी असून गुजरात राज्यातील व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री भुवनेश्वरी माता आश्रम विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. आश्रम जंगलात असल्याने वीजपुरवठ्याची सोय नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी विहिर गेल्या पन्नास वर्षापासून खोदण्यात आली असलीतरी जलपातळी खालावली आहे. माजी आमदार जगदीश वळवी यांच्या निधीतून येथे सौर दिवा बसविण्यात आला आला होता मात्र गेल्या दोन वर्षांपूसन तो बंदावस्थेत आहे. वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात मात्र भाविकांना राहण्यासाठी सुसज्ज असे निवासस्थान नाही.