तीर्थक्षेत्र आळंदीत मंगळवारी कार्तिकी एकादशी

0

राज्यभरातून लाखो भाविक अलंकापुरीत दाखल

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत मंगळवारी (दि. 14) श्रींच्या 722 व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी साजरी होत असून, राज्यभरातून या सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. नवमीनिमित्त रविवारी (दि.12) माउली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन केले होते.

दशमीनिमित्त सोमवारी (दि.13) माउली मंदिरात श्रींना पवमान अभिषेक,दुधारती, भाविकांच्या महापूजा, दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा, श्रींना महानैवेद्य, तसेच कीर्तनसेवा हरीनाम गजरात होणार आहे. तसेच, भाविकांसाठी कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, जागर आदी धार्मिक उपक्रमांतून विविध कार्यक्रमांची पर्वणी लाभली आहे. मंगळवारी (दि.14) कार्तिकी एकादशी साजरी होत असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांची लगबग सुरू असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.