तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत भक्त निवासाचे भूमीपूजन

0

वरखेडी । पाचोरा तालुका हे सावखेडा परिसराचे आराध्य देवत जागृत देवस्थान म्हणून संपुर्ण महाराष्ट्राला प्रसिद्ध असलेले श्री भैरवनाथ बाबा मंदिराचे महराष्ट्र शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास व सुशोभिकरण योजने अंतर्गत समावेश करण्यात आले असून विविध विकास कामांना मंजूरी मिळालेली आहे. या विकास कामंचे भूमिपूजन भैरवनाथ मंदिराच्या पटगणात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या तीर्थ क्षेत्र विकास व सुशोभिकरण योजने अंतर्गत मंजूर 2 कोटी 76 लाख रुपयाचे कामे होणार आहे. पहिल्या टप्प्यात 25 लाखात भक्ती निवासस्थानाचे काम होणार आहे. उर्वरीत काम टप्या टप्याने होणार असून त्यात, वाल कम्पाऊट, पेंविग बॉल (वॉक्स) भक्तीनिवासच्या दुसरा मजला ,गेट,रस्ते यासह विविध कामे दुसर्‍या तिसर्‍याव चौथ्या टप्पात पूर्ण करण्यात येते आहे.

यांची होती उपस्थिती
या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत, सरपंच किरण पाटील , उपसरपंच कैलास तांबे, अँड.दिनकरराव देवरे, उद्धव मराठे, आरुण पाटील, भरत खंडेलवाल, रमेश पाटील, पप्पू राजपूत, सी.एस.वाडीले, एस.एस.पाटील, मनोज पाटील, सुनील परदेशी, गोकुल परदेशी, पितांबर पाटील, एकनाथ पाटील, तुकाराम पाटील, अनिल परदेशी, भगवान पाटील, अनिल पाटील, ईश्वर परदेशी, प्रकाश मोची, प्रकाश परदेशी, राजू परदेशी, अण्णा भाऊ परदेशी, कर्तरसिंग परदेशी, युवराज पाटील, मोतीलाल परदेशी, भावलाल परदेशी, दिपक परदेशी यांच्यासह संचालक मंडळ गावातील नागरिक उपस्थित होते.

कर्जमाफीवरुन फसवणूक
भैरवनाथबाबा मंदिराचे तीर्थ क्षेत्र विकास व सुशोभिकरण योजने अंतर्गत कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार पाटील यांनी शासनाने केलेली कर्जमाफी ही फसवी असून रिझर्व्ह बँक किवा नाबार्ड कडून कोणतेही परिपत्रक जाहीर करण्यात आलेले नसल्याचे व नियमीत कर्जदारांसाठी 25 हजाराच्या सूटसाठी बाकी मुदत 30 जूनची मुदतीची अट कर्जमाफीत टाकण्यात आली आहे. त्याचा लाभ अनेक शेतकर्‍यांना होणार नसल्याचे सांगितले.