नवापूर । गेल्या आठवठ्यापासुन नवापूर शहर व परिसरात तापमानाचा पारा वाढला असून शहरातील रस्ते निर्मनूष्य झाली आहे. शहरात वाढत्या उन्हामुळे दुपारी अनेक व्यापारी दुकाने बंद ठेवणे पसंद करीत असल्याने बाजारपेठांमध्येही शुकशुकाट जाणवत आहे. 41 अंश डिग्री कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवापूर नगरीचा तापमानाने उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत या उन्हापासून बचाव करावा, आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
अधिक पाणपाई हव्या
नागरीकांनी उन्हाचा बचाव करण्यासाठी टोपी, रुमाल, छत्री, स्कार्पचा उपाय करत आहे. दुपारी 12 नंतर नागरीकांनी बाहेर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने ही उपाय योजना सुचविल्या आहेत. नवापूर शहरात लिमडावाडी, बसस्थानक, देवळफळी या भागात सेवाभावी संस्थांनी पाणपोई सुरु केली आहे हि एक चांगली बाब आहे या पाणपोई पुरेशा नाहीत. वाढत्या उन्हाचा तडाक्यामुळे नागरीकांना वारवारं तहान लागते. पाण्याची तहान भागविण्यासाठी लोक इकडे तिकडे फिरतात कोणी पाणी देत तर कोणी देत नाही.म्हणुन शहरातील व्यापार्यांनी आपल्या दुकाना बाहेर थंड पाण्याचे जार ठेवले तर लोकांना सोय होईल अशी अपैक्षा आहे व्यापारी संघटनेने या विषयी विचार करावा.
बाजारपेठा थंडावल्या
जास्त तापमानामुळे शहरातील बाजार पेठे वरही परिणाम झाला आहे. सकाळी दुपारी 12 ते 1 पर्यत कामे आटोपुन नागरीक घरात राहणे पसंद करत आहे. दुपारी 5 नंतर लोक घराबाहेर पडतात. त्यानंतरच शहरात गर्दी जाणवते. घरात बसून ही कुलर पंख्याची थंड हवा खाऊन ही उष्ण झळा जाणवु लागल्याने जीवाची लाही लाही होत आहे. शाळा, काँलेज मध्ये परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थाना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. कुलर, एसी खरेदी कडे नागरीकांचा कल वाढला आहे.
पाण्याचे योग्य नियोजन
तापमान वाढीमुळे उष्ण लाटेचा झळा बसत आहे.तापमान वाढत असल्याने रंगावली नदीची पाण्याची पातळी खालावली असुन नदी पात्र कोरडे पडत आहे. तर काही भागात कृत्रिम पाणी टंचाई जाणवत असून काही कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. मागचा वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने केटी वेअर बंधार्यात बर्यापैकी जलसाठा होता, मात्र पावसाच्या जोराने केटीवेअरच्या किनार्या कडील मातीचा भराव वाहून गेला असतांना नगर पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी पाण्याचे नियोजन चांगले केल्याने नवापूरकरांना तीव्र उन्हाळ्यात ही दोन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे.