नवापूर । व्यापारी संकुलाच्या नियमबाह्य बांधकाम करणार्या बांधकाम व्यावसायीकांवर, वास्तुविशारदांवर व भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करुन त्यांचे हित जोपासणार्या नगर परिषद प्रशासनातील अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करुन गुन्हे दाखल करणे ,नियमबाह्य बांधकाम जमीनदोस्त करणे याबाबत तात्काळ निर्णय किंवा कार्यवाही न झाल्यास दि 22 मे रोजी मंञालयासमोर आत्मदहन करणेबाबतचे आंदोलन शिवसेना तालुकाप्रमुख गणेश वडनेरे यांनी तहसिलदारांचे लेखी आश्वासनामुळे स्थगित केले
आहे.
आंदोलनामागची ठोस भूमिका
नियमाप्रमाणे पाकिंग, संडास बाथरुम व्यवस्था न केल्यास संबंधितींचे अतिरिक्त बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करणे, नियमबाह्य बांधकामाला संमती देणा-या वास्तुविषारदाचे लायसेन्स रद्द करुन कायदेशीर कारवाई करणे, संबंधित बांधकामांची मंजुरी देऊन बांधकाम नियमाप्रमाणे आहे किंवा नाही याची पाहणी करणार्या कर्मचारी अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करुन त्यावर कायदेशीर कार्यवाही करणे, जिल्हाधिकारी यांना न.पा. पञ क्र ननपा/बांध/2034/2016 दि 8/3/2016 रोजी संबंधित बांधकाम व्यवसायकावर प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52,53,54 अन्वये नवापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद केल्याबाबतची लेखी व खोटी माहिती देणा-या न.पा.च्या मुख्याधिकारी यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणे, नियमब्राह्य बांधकाम करणा-या बांधकाम व्यावसायकांवर,वास्तुविषारदांवर व त्यांचे हित जोपासणा-या अधिकारी कर्मचा-यांची जबाबदारी निश्चिती करुन गुन्हे दाखल करणे.
कार्यवाहीकडे केले दुर्लक्ष
नवापूर शिवसेनेने मागील अनेक वर्षापासून शहरात होणार्या नियमब्राह्य बांधकाम करुन कोणतीही सुविधा देत नसलेल्या व्यापारी संकुलामुळे उदभणा-या वाहतुक प्रश्न ,पाकिंग प्रश्न,संडास मुता-यांच्या व त्यासह अनेक समस्यामुळे नवापूरकर जनतेला रोज अनेक ञासांना सामोरे जावे लागत आहे.या कारणास्तव जिल्हाधिकारी यांना दिनाक 21/2/2017 रोजीच्या पञान्वये नियमबाह्य बांधकाम करणार्या मालक वास्तुविषारद बांधकाम परवानगी देणारे नगरपालिका प्रशासन यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणे.नियमबाह्य बांधकाम पाडणे,सदरच्या बेकायदेशीर बांधकामांना नजरेआड करुन स्वत:चे व संबंधितांचे हित जोपासणा-या नगर परिषद अधिकारी व कर्मचा-यांची जबाबदारी निश्चित करुन कार्यवाही करणे तसेच जिल्हाधिकारी यांना लेखी खोटी माहिती देणा-या नगर परिषद प्रशासनातील अधिका-यांवर कार्यवाही करणेकामी संदर्भ क्र.1 नुसार पञ दिले होते व कार्यवाही न झाल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी उपोषण करण्यात येईल बाबत कळविण्यात आले होते.सदर पञाचे उत्तर दि 26/4/2017 रोजी प्राप्त झाले व आपल्या विनंतीनुसार व आपल्याकडून योग्य ती कार्यवाहीचे आश्वासनाअंती सदर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
यांनी केली मध्यस्थी
याप्रकरणी गांभीर्य ओळखून तहसीलदार प्रमोद वसावे यांनी नेहमीप्रमाणे मध्यस्थी करून व मूख्याधिकारी नवापूर नगर पालीका यांनी सर्वांसमोर कबूल करून घेत विनंती करून लेखी आश्वासन दिल्यामूळे नवापूर शिवसेनेने पूकारलेले आत्मदहन आंदोलन तूर्त स्तगीत केले आहे त्या बैठकीला तहसीलदार नायब , मूख्याधिकारी, पोलीस निरीक्षक साो कार्यालय प्रमूख मिलींद भामरे, नगरपालिकेचे अभियंता सूधीर माळी, राजेद्र चंव्हाण तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमूख हसमूख पाटील, शिवसेना तालुका प्रमुख गणेश वडनेरे उप तालूका प्रमूख प्रविण ब्रंम्हे शहर संघटक आनिल वारूडे, यूवा सेनेचे शहर अधिकारी राहूल टिभे, उपतालूका अधिकारी किशन कोळी, दिनेश भोई उपस्थित होते.