मुंबई । बॉलिवूडची चाँदणी श्रीदेवीचा मृत्यू प्रकरणाला एक्सीडेंटल ड्राउनिंग सांगून केस बंद केली आहे. परंतु, भारतात अजूनही श्रीदेवीच्या चाहत्यांमध्ये संभ्रम आहे की, त्या रात्री नेमके काय झाले होते. बोनी कपूर यांनी आपला मित्र आणि ट्रेड अॅनालिसिस कोमल नाहटाला 24 फेब्रुवारीला त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. त्यांनी तो आपल्या ब्लॉगवर लिहिला आहे. श्रीदेवीला त्यांची खूप आठवण येत होती. त्याच दिवशी ते संध्याकाळी हॉटेलवर पोहोचले.
आणि बोनी टीव्ही पाहू लागले…
बोनी कपूर यांच्यानुसार, ते फ्रेश होऊन आल्यानंतर श्रीदेवी हॉटेलच्या मास्टर बाथरूमध्ये अंघोळ करण्यासाठी आणि तयार होण्यासाठी निघून गेल्या. बोनी लिविंग रूममध्ये टीव्हीवर साउथ आफ्रिका-इंडियाची मॅच पाहू लागले. काही मिनिटांनंतर त्यांनी चॅनल बदलले आणि पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट मॅच पाहू लागले. रात्री 8 च्या सुमारास ते उठले. त्यांनी डिनरचा प्लॅन बनवला.
परंतु काहीच उत्तर मिळाले नाही…
बोनी कपूरने सांगितले की, त्यांनी लिव्िंहग रूममधूनच श्रीदेवी यांना आवाज दिला. परंतु, तिचे काहीच उत्तर आले नाही. नंतर त्यांनी टीव्हीचा व्हॉल्यूम कमी केला, तेव्हादेखील श्रीदेवीचे काहीच उत्तर आले नाही. यानंतर बोनी बेडरूममध्ये गेले आणि बाथरूमचा दरवाजा वाजवला आणि आवाज दिला. बोनीने जोरजोरात ’जान’, ’जान’ असे म्हणतदेखील आवाज दिला. परंतु, श्रीदेवीचे काहीच उत्तर मिळाले नाही. आत जाताच त्यांनी पाहिले की बाथटब पाण्याने पूर्ण भरलेला होता आणि श्रीदेवी डोक्यापासून ते पायापर्यंत टबमध्ये डुबलेली होती. बोनी श्रीदेवीपर्यंत पोहोचले. परंतु, ती काहीच हालचाल करत नव्हती.
24 वर्षांनी ट्रिप
बोनीने सांगितले की, गेल्या 24 वर्षांपासून दोघांनी एकही विदेश ट्रिप सोबत केली नाही. श्रीदेवीच्या इतर ट्रिपमध्ये ते तिच्याबरोबर नव्हते.