शेंदुर्णी । येथील समस्त ग्रामस्थ व बारी समाजाचे वतीने श्री संत रुपलाल महाराज पुण्यतिथी व हनुमान जयंती आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी (देवाची) शताब्दी महोत्सवानिमित्त 12 एप्रिल ते 19 एप्रिल 2017 असा तुकाराम महाराज गाथा संगीत पारायण सोहळा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. 18 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 7 भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 19 एप्रिल रोजी दुपारी 11 ते 2 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेंदुर्णी ग्रामस्थ तथा बारी समाजातर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची दैनंदिनी याप्रमाणे
दररोज प्रातः 5 ते 6 काकडा आरती, सकाळी 6ते7 विष्णूसहत्र नाम, 7 ते 11 संगीत गाथा पारायण, दुपारी 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 हरिपाठ, 8 ते 10 कीर्तन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री.ह.भ.प. शिवशंकर महाराज लांडे, श्री. ह.भ.प.सचिन महाराज, श्री ह.भ.प. अरुण महाराज आळंदी देवाची हे गाथा पारायण व्यासपीठ नेतृत्व करणार आहेत. 12 रोजी श्री हभप. मच्छीन्द्रजी महाराज वाडीभोकर, 13 रोजी हभप. पोपटजी महाराज, कासारखेडा, 14 रोजी हभप. ज्ञानेश्वर माउली कदम आळंदी देवाची, 15 रोजी श्री हभप. उमेशजी महाराज दशरथे, 16 रोजी श्री.ह.भ.प. संजयजी महाराज पाचपोर, 17 रोजी श्री.ह.भ.प. अनिरुद्धजी महाराज क्षीरसागर, कडवंचीकर, 18 रोजी श्री हभप. पुरषोत्तमजी महाराज बावस्कर, 19 रोजी हभप. मुरलीधरजी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.