जय हरी ग्रुप सेवा संस्थेचा उपक्रम
पिंपरीः जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरु आहे. गुरुवारी (दि. 12) पालखी कुरकुंभ, रोटी घाटातून बारामती रोडपर्यंत पोहोचली. पालखीसोबत चालत जाणार्या वारकर्यांना जय हरी ग्रुप सेवा संस्था पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले. यंदा संस्थेचे या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे. पालखीसोबत चालत जाणार्या प्रत्येक वारकर्यांमध्ये विठ्ठल असतो. प्रत्येक वारकरी विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होऊन पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असतो. या भावनेतून वारकर्यांना संस्थेच्यावतीने अन्नदान करण्यात आले. तसेच मोफत पाणी पुरवठा करण्यात आला. या अन्नदानाचा 15 हजार वारकर्यांनी लाभ घेतला. दातीर पाटील परिवारच्या वतीने वारकर्यांना मोफत चहा-बिस्किटांचे वाटप करण्यात आले.