तुकाराम मुंढेंना धमकीचे पत्र

0

पुणे । धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. पीएमपीला फायद्यात आणण्यासाठी वेळेप्रसंगी कठोर निर्णय घेण्यासही ते कचरत नाहीत. परंतु त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. कारण जेष्ठांच्या पासमध्ये केलेली दरवाढ कमी करा; अन्यथा परिणाम वाईट होतील, असे धमकी देणारे पत्र त्यांच्या नावाने पीएमपीएमएलच्या कार्यालयात येऊन धडकल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे पत्र पुणे शहरातील सुखसागरनगर या परिसरातून आले आहे.