तुकाराम मुंढे यांची बदली; तीन वर्षात सहावेळा बदली

0

नागपूर: आपल्या कार्यशैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूरहून बदली झाली आहे. नागपूर महापालिकेतील भाजपा नगराध्यक्षा विरोधातील वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला आहे. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याजागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांना पदभार सोपवून तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी स्वीकारावी असा आदेश काढण्यात आला आहे.

मागील तीन वर्षात ६ वेळा त्यांची बदली झाली आहे. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यातच त्यांची बदली झाली आहे. राजकीय नेत्यांशी त्यांचे नेहमीच वाद होत असतात. नागपूर महापालिकेतील वाद तर संपूर्ण महाराष्ट्रातील चर्चेचा विषय होता. त्यांची बदली व्हावी अशी मागणी होत होती. अखेर त्यांची बदली झाली आहे.