तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना भेटणार : बापट

0

पिंपरी-चिंचवड : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना राज्यसेवेत परत पाठविण्याची मागणी महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी केली आहे. मुंढे यांच्याबाबत पिंपरी पालिकेतील पदाधिकार्‍यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येईल.

त्यांच्यासोबत पीएमपीएमएल आणि मुंढे यांच्याविषयी चर्चा केली जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.मुंढे यांची काम करण्याची पद्धत हिटरशाही प्रमाणे आहे. त्यामुळे त्यांना राज्यसेवेत पाठविण्याची मागणी, स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सदस्यांनी आक्रमकपणे केली होती. याला पुरक भूमिका बापट यांनीही दर्शविली.