जळगाव : शहरातील तुकारामवाडी परिसरात असलेल्या हार्टवेअर व प्लंबिंगचे साहित्य असलेल्या बालानी सेल्स या दुकानाला रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील प्लंबिंगचे ६० ते ६५ लाखांचे साहित्य जळुन खाक झाले असुन नुकसान झाले आहे.
आठ अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात
सिंधी कॉलनी परिसरातील कंवरनगर येथील रहिवाशी जगदीश रामचंद्र बाळांनी यांचे तुकारामवाडी बालानी सेल्स एजन्सी नावाचे हार्डवेअर व नळ साहित्य विक्रीचे दुकान व गोदाम आहे. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले यानंतर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारात त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूस राहणार्या पंकज खानगर यांनी बालानी यांना फोनवरून त्यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर वाल्यांनी भावंडांसह दुकानाकडे धाव घेतली घटनास्थळ गाठले असता दुकनाचा पहिला व दुसरा मजला आगीच्या विळख्यात सापडला होता. आगीची माहिती मिळाल्यानुसार महापालिकेचे तसेच जैन एरिगेशनचे अग्निशमन बंबही घटनास्थळी पोहोचले होते. तब्बल ५ ते ६ तासानंतर पहाटे पाच वाजता महापालिकेचे ६ अग्नीशमन बंब व जेैन एरिगेशनचे दोन अशा एकूण आठ अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात आली. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांनीही कर्मचारी दीपक पाटील यांच्यासह घटनास्थळ गाठून मदतकार्य केले.
शॉवर फिटिंग नळ व प्लॉस्टिकचे साहित्य जळुन खाक
या आगीत दुकानातील शॉवर साहित्य , प्लास्टिकचे नळ, शॉवर फिटिंग तसेच शॉवरचे, बाथरुमचे रॉड व प्लास्टिकचे साहित्य असे एकूण ६० ते ६५ लाखांचे साहित्य जळुन खाक झाले आहे. या प्रकरणी दुकानाचे मालक जगदीश बालानी यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करणार आली असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल वाघमारे, सचिन मुंडे करीत आहेत.