जळगाव । संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. जुने जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानपासून शोभायात्रेला सुरवात झाली.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळीच्या पायघडया टाकण्यात आल्या होत्या. तसेच शोभायात्रेचे चौकाचौकात स्वागत
करण्यात आले.