नवी दिल्ली: दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ सध्या देशात चर्चेच्या स्थानी आहे. तीन दिवसांपूर्वी एकाने जामिया विद्यापीठ परिसरात गोळीबार केला होता. दरम्यान जामिया परिसरात पुन्हा रविवारी रात्री पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वीच या विद्यापीठात आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला होता. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेट नंबर पाच जवळ रविवारी रात्री गोळीबार झाला. स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार करुन पळ काढला.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेकडो विद्यार्थी आणि स्थानिक विद्यापीठाबाहेर जमा झाले होते. दिल्लीतच शाहीन बागमध्ये सीएए विरोधात आंदोलन सुरु आहे. तिथे सुद्धा गोळीबार झाला होता. पोलिसांनी गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी तपास सुरु केला आहे.