दुबई । इराणच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारणारी दहशतवादी संघटना आयसीसने आता सौदी अरेबियाला हल्ल्याची धमकी दिली आहे. एसआयटीई या गुप्तचर संघटनेने ही माहिती दिली. इराणची संसद आणि आयातुल्ला खोमेनी यांच्या समाधीस्थळावर बुधवारी झालेल्या हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला होता. आयसीसने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारताना इराणमधील बहुसंख्य शिया समुदायांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. इराणमधलि हल्ल्याच्या आधी एसआयटीईच्या हाती एक व्हीडिओ लागला होता. त्यात पाच बुरखाधारी व्यक्तिंनी इराण आणि सौदी अरेबियातील शिया समुदायांवर हल्ला करण्याची धमकी दिली. एक अतिरेकी म्हणाला की, अल्लाच्या परवानगीने या ब्रिगेडचा इराणमधील हा पहिला जिहाद करण्यात येईल. आम्ही मुस्लीम बांधवांना विनंती करतो की आमचे अनुकरण करा. जी आग आता लावण्यात आली आहे ती विझू देऊ नका. अल्लाने परवानगी दिली आहे. असे या व्हिडिओत दाखवण्यात आल्याचे एसआयटीईच्या एका अधिकार्याने सांगितले. व्हिडिओच्या शेवटी सौदी अरेबियाच्या सरकारलाही अशा स्वरुपाचा संदेश देण्यात आला आहे. दरम्यान इराणच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यात आयसीसमध्ये सामिल झालेले पाच इराणी नागरिकांचा समावेश होता. असे इराणच्या सुरक्शा अधिकार्यांनी सांगितले. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने या हल्ल्यसाठी सौदी अरेबियाला जबाबदार धरले असून बदला घेण्याची धमकी दिली आहे. सौदी अरेबियातील सुन्नी समुदायाने मात्र या हल्ल्याशी काही संबध नसल्याचे सांगितले आहे. सौदीअरब, इजिप्त, युएई आणि बहरीनने कतारवर बंदी आणि राजनैतिक संबध तोडल्यावर आखातात तणाव निर्माण झाला आहे.
भारतीय सुरक्शीत
कतारच्या मुद्यावरुन भारतीय नागरिक सुरक्शित असल्याचे आखाती देशांनी स्पष्ट केले आहे. कतारमधील परिस्थितीबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय अधिकारी कतारमधील स्थितीवर लक्श ठेवून आहेत. हा वाद संबधीत देशांनी सकारात्मक बातचीत करुन मिटवावा. या प्रदेशात शांतता निर्माण करण्यासाठी होणारी चर्चा आंतरराष्ट्रीय सबंधांना अनुसरून असावी. दुसर्यांच्या अंर्तगत प्रश्नांमध्ये हस्तक्शेप करु नये.
इराणनंतर तुमची वेळ
इराणनंतर तुमची पाळी असेल. अल्लाच्या मंजूरीने आम्ही तुमच्यावरही हल्ले करु. आम्ही कोणाचे दलाल नाहीत. आम्ही अल्लाने दिलेल्या आदेशाचे पालनकर्ते आहोत, त्यांचे दूत आहोत. आम्ही धर्मासाठी लढत असून, इराण किंवा अरबस्तानसाठी आमची लढाई नाही. असा संदेश आयसीसीच्या दहशतवाद्यांनी व्हिडिओमार्फत सौदी अरेबियाला दिला आहे. सीरीया आणि इराकच्या काही भागावर ताबा मिळवणार्या आयसीसच्या दहशतवाद्यांनी याआधी सौदी अरेबियाच्या संरक्शण दलावर हल्ला केला आहे.