देवकरांचे भावनिक आवाहन ; आव्हाणे, कानळदा परिसरात प्रचंड गर्दीत प्रचार रॅली
जळगाव – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आज (दि.१३) कानळदा, आव्हाणे गावांमध्ये प्रचार व संवाद रॅली काढली होती. परिसरातील गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी व युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना ग्रामविकासासाठी परिवर्तन करून राष्ट्रवादी आघाडीला मताधिक्य देण्याचे आवाहन केले.
प्रचार रॅलीच्या प्रारंभी आव्हाणे व कानळदा येथील मारुती मंदिरात पूजा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन गावातून प्रचार व संवाद रॅली काढण्यात आली. गाव व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देवून राष्ट्रवादीला मताधिक्य देणार असल्याचे आश्वासन यावेळी देवकर यांना दिले. दरम्यान अनेक ठिकाणी महिलांकडून देवकर यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना श्री.देवकर म्हणाले की, या काळ्या मातीत कष्ट करणार्या शेतकर्यांचीच ज्यांना काळजी नाही, त्या सत्ताधार्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. यांच्या कार्यकाळात शेतीमालाला भाव मिळाला का? सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले का? असे सवाल उपस्थित करत, पालकमंत्री असतांना आघाडी सरकारच्या माध्यमातून केवळ मतदारसंघातीलच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. तुमच्यासोबत या काळ्या आईशी इमान बाळगणारा हक्काचा माणूस म्हणून मला मताधिक्य देवून दिल्लीत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.
कानळदा व आव्हाणे येथे प्रचार रॅलीचा शुभारंभ केल्यानंतर परिसरातील उर्वरित खेडी, नांद्रा, कुवारखेडा, नंदगाव, फेसर्डी, फुकणी, देवगाव, गाढोदा, आमोदा, जामोद, पळसोद, भोकर, भादली, कठोरा, किनोद, सावखेडा, करंज, धानोरा या गावांमध्ये राष्ट्रवादीचे नेते गोपाळ पाटील, रमेश पाटील, बापू परदेशी, मच्छिंद्र पाटील, दिलीप पाटील, विजय नारखेडे, प्रशांत पाटील, गोकुळ चव्हाण, राजू सर, राजू पाटील, अरुण कोळी, मनोहर पाटील, जितू अत्रे, योगराज सपकाळे, भूषण पवार, हेमंत पाटील, नवल पाटील, बंटी चव्हाण, ईश्वर पाटील, भूषण पाटील, सुधाकर सपकाळे, नांद्रा सरपंच शांताराम पाटील, डॉ.सुधाकर पाटील, संभाजी पाटील, विलास सोनवणे, ईश्वर पाटील, भिका पाटील, धवल पाटील, सतीश पाटील, चेतन सपकाळे, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, समाधान पाटील, डॉ.भगवान पाटील, कालिदास सपकाळे यांनी गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ रॅली काढून परिसरातील लोकांना राष्ट्रवादी आघाडीला मताधिक्य देण्याकरिता आवाहन केले.