सोलापूर । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही दिवसा चहा पिता हे खरे असले, तरी रात्री कुठली आणि किती पिता हे मला माहीत आहे. त्यामुळे काही पण करायचे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा नाद करायचा नाही, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. तुमचे दिल्लीतील बॉस पवारसाहेबांचे बोट धरून राजकारणात आल्याचे कबूल करतात. त्यामुळे पवार साहेबांवर बोलण्याची तुमची लायकी नाही. असे मुंडे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महामेळाव्यात शरद पवारांना लक्ष्य केले होते. चहावाल्यांच्या नादी लागल्याने 2014 साली धूळधाण झाली. आता 2019 मध्ये आमच्या नादी लागाल तर औषधालाही उरणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी पवारांवर हल्लाबोल केला होता. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात धनंजय मुंडे यांनी सोलापुरात हा पलटवार केला.