तुरीसह मका, ज्वारी खरेदी केंद्रासाठी प्रशासनाला साकडे

0

मुक्ताईनगरात शिवसेनेचे तहसील प्रशासनाला निवेदन

मुक्ताईनगर- पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या व दुष्काळाच्या छायेत असलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांनी प्रतिकुल परीस्थितीशी सामना करीत जेमतेम स्वरुपात उत्पन्न घेतलेले आहे. त्यातच पीक कर्ज व शेतीसाठी उचल केलेली बाकी देणे असल्याने शेतकरी शासनाच्या तूर, मका व ज्वारी खरेदी केंद्राची आतुरतेने वाट पाहत असून शासनाने बळीराजाची कसोटी न पाहता तत्काळ तूर, मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगायोचे नायब तहसीलदार मिलिंद बाविस्कर यांना देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख छोटू भोई, मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, गटनेता राजेंद्र हिवराळे, शहरप्रमुख गणेश टोंगे, शेख हारुन मिस्त्री, अमरदीप पाटील, जाफर अली, संतोष माळी, गोकुळ पाटील, दीपक पवार यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.