काराकस । व्हेने झुएलातील व्हॅलेंसिया येथील एका तुरुंगात भडकलेला हिंसाचार आणि फायरिंगच्या घटनांमध्ये दोन महिलांसह किमान 68 लोकांचा मृत्यू झाला. सर्व मृतांमध्ये सर्व कैद्यांचाच समावेश आहे. तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्यावर फायरिंग करण्यात आले. या घटनेनंतर कैद्यांचे नातेवाईक तुरुंगाबाहेर जमा झाले आणि त्यांची गोंधळ घालायला सुरुवात केली.
ही घटना घडली आहे ती व्हेनेझुएला येथील व्हेलेनसिया नावाच्या शहरात. या शहरात असलेला तुरुंग कैद्यांनी तोडला तो तोडून ते पळून जात होते. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांना थांबवण्यासाठी गोळीबार केला. गोळीबार झाल्यावर चेंगराचेंगरी झाली.. कैदी सैरावैरा पळू लागले. ज्यामुळे या घटनेत एकूण 68 जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या सुरुवाती धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर हिंसाचार उसळला. या कैद्यांपैकी काही जणांनी पोलिसांची बंदुक हिसाकावली होती. तुरुंगात काही कैद्यांमध्ये आपसात वाद झाला. या वादाचे रुपांतर धक्काबुक्की आणि नंतर हिंसाचारात झाले. काही कैद्यांनी तुरुंग तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला.