नवी मुंबई । तुर्भे एमआयडीसी मधील मोडीप्रो केमिकल कंपनीला रविवारी दुपारी चार च्या सुमारास अचानक आग लागली.या आगीत कंपनीचे तीन कामगार जखमी झाले असून 50 हून अधिक कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.या प्रकरणाची नोंद तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तुर्भे एमआयडीसी मधील डी 16 या भूखंडावर मोडीप्रो केमिकल कंपनी असून या कंपनीत रविवारी 50 हून अधिक कर्मचारी काम करत असतांना अचानक 4 च्या सुमारास आग लागली.या आगीमुळे कंपनी परिसरात एकच खळबळ माजली असता कामगारांनी पळापळ सुरु केली.यात तिघे जण जखमी झाले.कंपनीत केमिकलचे प्रमाण जास्त असल्याने आगीने काही क्षणात भव्य रूप धारण केले.
केमिकलमुळे आग वाढली, 8 बॉयलर चे स्पोट
यातच एकामागोमाग 8 बॉयलर चे स्पोट झाल्याने आग अजूनच भडकली.बघता बघता संपूर्ण कंपनी आगीच्या आधीन झाली.घटना स्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या असत्या त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले.मात्र आगीचे रौद्र रूप पाहता तब्बल 8 गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट न झाल्याने त्याचे कारण शोधण्यात येत आहे. त्याच कंपनीच्या आजूबाजूला इतरही कंपन्या बरोबर एच पी गैस चा प्लांट आहे.या आगीत सतत होणार्या स्पोट मुळे अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या.