तुर्भे खुर्द येथील एसटी शेडचे भूमिपूजन

0

पोलादपूर। तालुक्यातील तुर्भे खुर्द येथील रहिवासी शिवराम उतेकर यांचे उद्योजकपुत्र अमोल उतेकर यांनी तुर्भे खुर्द व बुद्रुक आदिवासीवाडीतील ग्रामस्थांना एसटी गाडीची वाट पाहताना उन्हा-पावसांत ताटकळत उभे राहावे लागत असल्याची गैरसोय लक्षात घेऊन या लोकवस्तीसाठी स्वखर्चाने एसटी पिकशेड उभारण्याचा निर्धार केला असून या पिकअपशेडचे भूमिपूजन गिरज्या कुशाबा उतेकर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी तुर्भे बुद्रुकचे सरपंच नरेश शेलार आणि तुर्भे खुर्दच्या सरपंच साक्षी मंगेश उतेकर, उपसरपंच गोविंद उतेकर, सदस्या सुवर्णा कदम, पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधीपक्षनेता नगरसेवक नागेश पवार आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

तुर्भे खुर्द आणि तुर्भे बुद्रुक या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सहकार्याने उद्योजक अमोल उतेकर यांनी हा आदिवासी लोकवस्तीसाठी स्वखर्चाने एसटी पिकशेड उभारण्याचा संकल्प केला असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.