जळगाव : केंद्र व राज्य शासन जिल्हा पुरस्कार प्राप्त मेहरुण परिसरातील तुळजाई-बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी देखील संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहिर करण्यात आले असून त्याचे वितरण रविवारी 26 रोजी मेहरुण येथील साईबाबा मंदिरात करण्यात आले. पूर्वी केवळ युवकांना हा पुरस्कार देण्यात येत असे मात्र यावर्षी पासून कै.प्रकाश वसंत वंजारी संस्थापक अध्यक्ष श्रीराम विद्यालय मेहरूण यांच्या स्मरणार्थ युवतींना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मेहरुण येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सदस्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रकाश राठोड, दीपमाला वंजारी, नरेंद्र पाटील, दिपाली निंभोरे, मोहन मेढे, गणेश पाटिल, अ.फ.भालेराव, दर्शन लोखंडे, प्रशांत सोनवणो, बालकवी दर्शन लाड यांना युवा जिल्हा पुरस्कार देवून गौरविण्यात आला. याप्रसंगी आमदार राजुमामा भोळे, शिवाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे, माजी उपमहापौर सुनील महाजन, सुनील पंजे,गणेशराव कोकाटे, शिरिषकुमार तायडे, गजानन लाड, भगवान लाडवंजारी, राजेंद्र पाटील, माजी उपअध्यक्ष लाडवंजारी, संजय घुगे, दिलीप लाडवंजारी, प्रमोद नाईक, अनिल देशमुख, सुभद्रा नाईक, प्रशांत नाईक, सुभाष लाडवंजारी, मनीष चव्हाण, प्रितम लाडवंजारी आदी उपस्थित होते. तुळजाई पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी संस्थेचे संचालक मनोज लाडवंजारी, घनश्याम सानप, शेखर लाडवंजारी, हर्षल ढाकणो,चंद्रकांत इंगळे, किशोर घुगे, महेंद्र उदमले, नितीन पाटील, मच्छिंद्र सोनवणे यांनी परिश्रम घेतले.