तुळजाई संस्थेतर्फे स्कॉलर स्कुलला संगणकाची मदत

0

जळगाव । शिवाजीनगर परिसरातील धनाजी काळे नगरात नवीनच सुरू करण्यात आलेली स्कॉलर इंग्लिश मिडीअम स्कुलला सुबोध बहुउद्देशीय संस्थेतर्फे संगणकाची मदत करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे स्वामी विवेकानंदचे अध्यक्ष पितांबर भावसार, लोकसंवाद संस्थेचे अध्यक्ष शिरिष तायडे, जितेंद्र सोनवणे, संध्याप्रकाश फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र वंजारी, प्रा.सागर पाटील जिल्हा परिषदचे किरण लाडवंजारी, मनीष चव्हाण लक्ष्य फाऊंडेशनचे रोशनभाऊ मराठे आदींची उपस्थिती होती.

यांनी केले मार्गदर्शन
स्वामी विवेकानंदचे अध्यक्ष पितांबर भावसार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, उच्च शिक्षण घेवून गरीबीवर मात करून नक्कीच अधिकारी व्हाल असे सांगितले. तर लोकसंवाद संस्थेचे अध्यक्ष शिरिष तायडे यांनी वेळोवेळी गरजेनुसार मदत करत राहू असे सागितले तर सामारोप प्रसंगी तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी जीवनात मिळालेली संधी कधीच गमवू नका असे म्हटले आणि अनिल जाधव,दीपक सुरडकर यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी केले तर आभार दीपक सुरडकर यांनी केले.