तुषार माळींना पोलीस कोठडी

0

धुळे । पंचायत राज समीतीच्या धुळे दौर्‍यात सदस्य आमदारांनी केलेल्या पाहणीत कापडणे गावातील शालेय पोषण आहारात अनिनियमितता आढळल्यामुळे चौकशी होऊ नये यासाठी येथील जिल्हा परिषेदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी आमदारांना दिड लाख रूपयाची लाच देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याचवेळी लाच लुचपत विभागाने सापळा कारवाई करून अधिकार्‍यास बेड्या ठोकल्या. माळी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कारवाईच्या भितीने जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी हॉटेल झंकार येथे नांदेडचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांना लाच देवू केली होती. आमदारांनी लाचेची रक्कम नाकारून या अधिकार्‍यास लाचलुचपत विभागाकडे सुपूर्द केले होते. माळी यांना धुळे येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता, गुन्हा गंभीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले व माळी यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . सरकार पक्षातर्फे अ‍ॅड निलेश कलाल यांनी काम पाहिले.