तूरघोटाळा सीबीआयला द्या

0

रत्नागिरी : मुख्यमंत्री फडणवीस यांनी तूर खरेदीत चारशे कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. या घोटाळ्यात मंत्री व अधिकार्‍यांचा सहभाग असल्याने राज्य सरकार पारदर्शक चौकशी करू शकणार नाही, म्हणून सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.चांदा ते बांदा शेतकरी संघर्ष यात्रेचा समारोप सावंतवाडीत झाला, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या, सातबारा कोरा करा, स्वामिनाथन अहवाल लागू करा म्हणून राज्यात संघर्ष यात्रा काढण्यात आली. या संघर्षयात्रेमुळे सरकारची संवादयात्रा व शिवसंपर्कयात्रा निघाली आहे. सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे ते म्हणाले.