Marijuana cultivation flourished in Turi’s fields : Erandol Police seized 61 lakhs worth of marijuana एरंडोल : एरंडोल पोलिसांनी गोपनीय माहितीवरून तुरीसह मक्याच्या शेतात फुलवलेल्या गांजा शेतीवर कारवाईचा बुलडोझर फिरवत 61 लाख 25 हजारांचा गांजा जप्त केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शुक्रवार, 4 रोजी झालेल्या कारवाईप्रकरणी मेरसिंह खरते (खरगोन, ता.मध्यप्रदेश) याच्याविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एरंडोल तालुक्यातील खडकेसीम येथील डिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या खडकेसीत शेत शिवारातील शेत गट क्रमांक 12 मधील तूर पिकाच्या शेतात गांजा शेती फुलवली जात असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवारी दुपारी छापा टाकून दोन्ही शेतातून 61 लाख 25 हजार रुपये किंमतीचा 875 किलो गांजा तसेच 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. कारवाईप्रकरणी मेरसिंह खरते (खरगोन, ता.मध्यप्रदेश) याच्याविरोधात हवालदार विलास पाटील यांच्या फर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोलचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहकार्यांनी केली.