यावल : तूर का पेरली म्हणत तालुक्यातील मालोदच्या इसमाला तिघांनी मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 30 जून रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. कैलास सुका भील (39, आडगाव रस्ता, पुलाजवळ, मालोद) यांच्या तक्रारीनुसार, 30 जून रोजी दुपारी चार वाजता खोलगट मालोद शिवारातील झाडी भागातील वनविभागाच्या जमिनीवर आठ दिवसांपूर्वी त्यांनी तूर पेरली होती. तूर पाहण्यासह सरपण आणण्यासाठी भील हे गेले असता संशयीत आरोपी भारसिंग तेरसिंग बारेला (वाघझिरा, ता.यावल) व अन्य दोन आरोपींनी (नाव, गाव माहित नाही) तूर का पेरली म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली तर एकाने भील यांना धरून ठेवल्यानंतर अन्य आरोपींनी काठी डोक्यात मारल्याने दुखापत झाली. तपास एएसआय अजीज शेख करीत आहेत.