कोलकाता । पश्चिम बंगालमधील सात स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला झेंडा फडकवून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर भाजपने तीन पालिकांमध्ये सहा जागा जिंकल्या आहेत. धुपगुडीत 16 पैकी 12 जागांवर तृणमूलनं बाजी मारली, तर चार जागा भाजपनं जिंकल्या. बुनियादपूरच्या 14 पैकी 13 वॉर्डांमध्ये तृणमूलचे उमेदवार विजयी झाले, तर एका जागेवर कमळ उमललं. यातून भाजप हळूहळू ते बंगालमध्ये पाय रोवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.