तृतीय पंथीयावर अत्याचार ; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

0
भुसावळ : नातेवाईकांना रेल्वेस्थानकावर सोडायला आलेल्या तृतीयपंथीयांवर पाच तरुणांनी आळी-पाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री रेल्वेच्या रंग भवनाजवळ घडली होती. या प्रकरणी तीन संशयीत आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली होती. आरोपींना बुधवारी अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरातील कवाडे नगर भागातील 19 वर्षीय पीडीत तृतीयपंथी आपल्या आई-वडीलांसह बहिणीला सोडण्यासाठी आल्यानंतर  डीआरएम कार्यालयाच्या रस्त्यावरून जात असताना संशयीत आरोपींनी रात्री 11.30 ते 12 वाजेच्या सुमारास अंगलट करण्याचा प्रयत्न करीत बळजबरी सुरू केल्याने त्याने पळ काढत रेल्वेच्या कला भवनाजवळ आसरा घेतला होता.
याप्रसंगी संशयीत आरोपी अशोक उर्फ आकाश भीमराव वानखेडे, स्वप्नील भगवान मेढे, शुभम भीमराव वानखेडे, अरविंद शरद सोनवणे व अन्य एका अनोळखी तरुणाने शिवीगाळ व मारहाण करीत अत्याचार केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रीक्षा चालक स्वप्नील मेढे, आकाश वानखेडे व शुभम वानखेडे यांना अटक करण्यात आली होती तर अन्य दोघा आरोपींचा कसून शोध सुरू आहे. अटकेतील आरोपींना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.