पिंपळनेर ।येथील तेरापंथी जैन समाजातर्फे अक्षय तृतीया निमित्ताने वर्षभर केलेल्या उपवासाचे तपोभिनंदन तथा पारणा महोत्सव समारोप जैन साध्वींच्या उपस्थितीत तर प्रतिष्ठित व्यापारी धनराज जैन कोचर यांच्या अध्यक्षतेखाली विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात करण्यात आला. सकाळपासून जैन महिला तपस्विनीच्या प्रमुख उपस्थितीत संत ठाकुरसिंह ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रांगणात परजिल्ह्यातून आलेल्या जैन समाज बांधवाच्या उपस्थितीत पारणा महोत्सव समारोप करण्यात आला.
यांनी पाहिले कामकाज
यावेळी शैलाबाई जैन, छायाबाई जैन, गजराबाई जैन, निर्मलाबाई जैन, भिकीबाई टाटीया, शैलाबाई चोरडिया, श्रीमती सीमाबाई जैन, कल्पना गोगड, जितेंद्र जैन व स्वरूप गोगड यांनी साध्वींचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी सुमेरमल जैन,धनालाल गोगड, प्रवीण जैन, डॉ. के.ए. चोरडिया, रिखब जैन, अनिल जैन, पंकज चोरडिया, राकेश जैन, तेजराज जैन,मनिष टाटीया, रमेश जैन, रावलमल जैन,महावीर गोगड आदींनी कामकाज पाहिले.
मान्यवरांची उपस्थिती
उपवासाची सांगता व पारणं उसाचा रस सेवन करून फेडण्यात आले. कार्यक्रमात पारसमल कुचेरिया,राजेद्र मुथा, कांतिलाल जैन,भुषण कुचेरिया, ज्योती कुचेरिया,यांचेसह बाहेरील तालुक्यातील जैन महिला व पुरूष सहभाग नोंदवून मनोगतं व्यक्तकेले. यावेळी या पारणं समारोपप्रसंगी आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या शिष्या शासनश्री साध्वी पदमावती (शहादा), साध्वीश्री मेरूप्रभाजी, साध्वीश्री मयंकप्रभाजी व डॉ. गवेषणाजी यांची उपस्थिती होती
11 महिलांचा समावेश
मागील 27 वर्षापासून एक वेळ आहार घेत असलेल्या कमलाबाई जैन यांची ही उपस्थिती होती. वर्षभर व्रत करणार्या तिलोत्तमा जैन,सुलभा टाटीया व सुवर्णा गोगड ,केशरबाई गोगड यांचे सह अकरा महिलांनी पारणे फेडले. वृषभ भगवान यांनी अकरा वर्षे हे व्रत करून उसाचा रस सेवन करून पारणं फेडले होते.