तेरा वर्षांच्या मुलीशी लैगिंक चाळे करणार्‍या तरुणाला अटक

0

मुंबई – घरात घुसून एका तेरा वर्षांच्या मुलीशी लैगिंक चाळे केल्याप्रकरणी 25 वर्षांच्या आरोपी तरुणाला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. गंगाराम चंद्रकांत आखाडे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात तेरा वर्षांची ही मुलगी राहते. 2 जुलैला दुपारी तीन वाजता ती एकटीच घरात होती. यावेळी तिच्या घरी गंगाराम घुसला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्याशी लैगिंक चाळे करण्याचा प्रयत्न केला. आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने तिला दिली होती. मात्र या मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिथे लोक जमा झाले. पळून जाण्याचा प्रयत्नात त्याला लोकांनी पकडून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला विनयभंग आणि बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिसांनी अटक केली.