हैदराबाद – केरळमध्ये सर्वत्र पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री सी. चंद्रशेखर राव यांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी २५ कोटींची तत्काळ मदत जाहीर केली आहे. राव यांनी त्यांचे मुख्य सेक्रटरी एस.के.जोशी यांना ही रक्कम ताबडतोब केरळला पाठविण्याचा आदेश दिला आहे. बचाव पथकांच्याद्वारे लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी अडीच कोटींची आर. ओ मशीन्स तेलंगाणातून पाठवली जाणार आहेत. पुरामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. याबद्दल राव यांनी दु:ख व्यक्त केले.
केरळमधील पूरपरिस्थिती गंभीर असून आत्तापर्यंत ३२४ हून अधिक जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे.