तेलंगणातील करीमनगरचे नाव करीपुरम करणार-योगी

0

हैद्राबाद-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लक्ष फक्त देशातील शहरांची नावे बदले इतकेच आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशमधील काही शहरांची नावे बदलली आहे. आता त्यांनी तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास करीमनगरचे नाव करीपुरम करणार असे आश्वासन दिले आहे. तेलंगणातील जनतेकडून सातत्याने अशी मागणी होत आहे. भाजप सत्तेत आल्यास लोकांच्या भावनांचा आदर राखत करीमनगरचे नामांतर करीपुरम करण्याचा प्रयत्न असणार आहे असे योगींनी सांगितले.

या अगोदर योगींनी हैद्राबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार असल्याचे सांगितले. तेलंगणामधील माजी भाजपा नेता टी राजा सिंह लोध यांनीदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आपला पक्ष तेलंगणामधील शहरांची नावे बदलणार असल्याचे सांगितले आहे.