तेलंगणात बँक फोडत लांबवले अडीच कोटी : जामनेरच्या चोरट्याला अखेर बेड्या

जामनेर : तेलंगणा राज्यात बँक फोडून तब्बल अडीच कोटी रुपयांची रक्कम लंपास करणार्‍या मूळच्या जामनेर येथील चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. शेख समीर शेख नासीर (जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला जामनेर पोलिसांनी तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

साथीदाराच्या मदतीने बँक फोडली
जामनेर येथील रहिवासी असलेला शेख समीर शेख नसीर हासराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने सुरत येथील काही साथीदारांनी घेऊन त्याने तेलंगणा राज्यातील कुंकनुर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार्‍या बँकेत दरोडा टाकून सुमारे अडीच कोटी रुपये चोरी केले होते. त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून कंकनूर येथील पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. शेख समीर शेख नासीर हा जामनेर येथील मूळ रहिवासी असल्याचे कळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यासाठी तेलंगणा पोलिस जामनेर येथे आले होते.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
या घटनेत जामनेर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून संबंधित चोरटा शेख समीर शेख नासीर याला पकडून अटक केली. आरोपीला तातडीने तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी जामनरेच पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जयेंद्र पगारे, योगेश महाजन, तुषार पाटील, निलेश घुगे यांनी तेलंगणा पोलिसांच्या मदतीने केली.