शहादा। येथील एमआयएमचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्या हत्येला जबाबदार मुख्य आरोपीस नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेनेे शुक्रवारी गुजरात राज्यातील सुरत येथे सापळा रचून अटक केली.
शहादा येथे राजकीय वादातून दोन दिवसापुर्वी दंगल उसळली होती. माजी उपनगराध्यक्श मुक्तार अहेमद शेख व एमआयएमचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्या गटातील वाद विकोपाला जाऊन सद्दाम तेली यांची हत्या करण्यात आली होती. साजीद उर्फ प्रेम याने सद्दाम तेली यांच्यावर पाठीमागून धारदार गुप्तीने वार केला होता त्यात सद्दाम तेली यांचा मृत्य झाला होता. घटनेनंतर साजीद फरार झाला होता.