तेली समाज मंडळाची सभा उत्साहात

0

जळगाव । जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा समाज मंगळ कार्यालयात उत्साहात झाली. यावेळी ऑगस्ट महिन्यात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ व नोव्हेंबर महिन्यात भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. सभेत अध्यक्ष आर.टी. अण्णा चौधरी, सुरेश चौधरी , सुरेश चौधरी, वामन चौधरी पारोळा, नारायण चौधरी, विजय चौधरी, पुंडलिक जावरे, एकनाथ चौधरी, भानुदास चौदरी, देेवेंद्र गांगुर्डे, गोपाल चौधरी, महेश चौधरी आदी सभासद उपस्थित होते.