तेली समाज वधु-वर सूचीचे प्रकाशन

0

एरंडोल। खान्देश तेली समाज सेवा संस्थेतर्फ राज्यस्तरीय वधु-वर सूची प्रकाशन करण्यात आले. श्री. क्षेत्र पद्मालय येथे सूची प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एरंडोल तालुका तेली समाज मेळाव्यात अनिल चौधरी यांचे व चोपडा नगर परिषदेच उपनगराध्यश जिवन चौधरी यांच्या हस्ते सूची प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी अनिल चौधरी यांनी संस्थेतर्फे आयोजित या वधु-वर सूची प्रकाशनला सर्वांनी सहकार्य करावे असे विनम्र आवाहन करत संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

समाज बांधवांची उपस्थिती
संजय चौधरी, मनोज पाटील, अशोक चौधरी, आनंदा चौधरी, एल.सी.चौधरी जे.बी.चौधरी, डि,ओ.चौधरी, सी.आर बापु, यशवंत चौधरी, योगराज चौधरी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात एरंडोल शहर, कासोदा , फरकाण्डे, जवखेडे , रिंगणगाव, तलइ आदी ठिकाणाहून तेली समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्ते, बांधव उपस्थित होते. सूचीचे फार्म जळगाव येथील व्ही.आर.पाटील ज्वेलर्स येथे उपलब्ध करण्यात आले आहे.